नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रोजगार मेळाव्यापाठोपाठ आता खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना आणि गरजूंना मिळावी, यासाठी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील विविध बँकांचे अधिकारी संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी नियोजनाचे विशेष पत्र खासदार हेमंत गोडसे यांनी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना सादर केले. संवाद मेळाव्यादरम्यान महामंडळाचे प्रशासकीय अधिकारी महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या विविध योजनांची माहिती देणार देणार आहेत. उद्योग, व्यवसायासाठी कोणते कागदपत्रे असणे आवश्यक आहे आणि तुमच्या उद्योग व्यवसायासाठी नेमके किती कर्ज मंजूर होऊ शकेल, याविषयीची माहिती बँक अधिकारी गरजूंना देणार आहेत.
हेही वाचा :
- पुणे : खरिपातील नुकसानीपोटी 29 लाख बँक खात्यावर जमा
- पोलिसांना चकवा देण्याचा आरोपीचा प्रयत्न अपयशी; इंदापूर न्यायालयासमोरील घटना
- वांग्यांचे भाव उतरल्याने शेतकरी हतबल; खेड तालुक्यातील परिस्थिती
The post नाशिक : शासकीय योजनांच्या माहितीसाठी जानेवारीत संवाद मेळावा appeared first on पुढारी.