नाशिक : शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद

बिबट्या www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
समृद्धी महामार्गालगत शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद करण्यात करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गालगत शिवडे शिवारात झापाळी परिसरात बिबट्याचा वावर होता. बिबट्या वारंवार नागरिकांच्या निदर्शनास येत होता. शेती क्षेत्राच्या लगतच्या घरामधील जनावरांवर बिबट्याच्या हल्लाच्या घटना घडल्या असून, रघुनाथ शेळके यांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला चढवला होता. नागरिकांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाने झापाळी मळ्यात पिंजरा लावला. यात पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजरा अडकला. नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचार्‍यांना कळवले आणि वनविभागाने सकाळी बिबट्यास सुरक्षितस्थळी हलवले.

हेही वाचा:

The post नाशिक : शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.