नाशिक : शिवसेनेची जम्बो कार्यकारिणी घाेषित

शिवसेना कार्यालय www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त खा. श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पक्षाची शहर व जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी घोषित करण्यात आली. सचिव भाऊसाहेब थोरात व जिल्हाप्रमुख अजय चौधरी यांनी कार्यकारिणी जाहीर केली.

नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांमध्ये शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांसोबत देवळाली मतदारसंघ, युवासेना, युवतीसेना, विद्यार्थीसेना, सहकार, लीगल व क्रीडा सेल, दिव्यांग सेना, झोपडपट्टी कामगार सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, अल्पसंख्याक, आदिवासी सेना तसेच शिव आंगणवाडी सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली. येत्या दोन दिवसांमध्ये संबंधित पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्राचे वितरण केले जाणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.

नाशिक महानगर पदाधिकारी
उपजिल्हाप्रमुख : श्याम साबळे व शशिकांत कोठुळे. उपजिल्हा समन्वयक : सुनील वाघ

जिल्हा कार्यकारिणी अशी : जिल्हाप्रमुख हर्षदा गायकर, चिटणीस :- पश्चिम विधानसभा प्राची पवार, मध्य विधानसभा : शीतल भवर, पूर्व विधानसभा : ऐश्वर्या उत्तेकर. जिल्हा समन्वयक : – पश्चिम विधानसभा : स्वरूपा राऊत, पूर्व विधानसभा : अनुजा चव्हाण, मध्य विधानसभा : योगिता ठाकरे. उपजिल्हाधिकारी :- मध्य विधानसभा : हर्षदा दिवटे, पश्चिम विधानसभा : पूजा महाजन, महानगर अधिकारी :- पश्चिम विधानसभा : स्नेहा शिरसाठ, इंद्रायणी पळसकर, महानगर चिटणीस :- पश्चिम विधानसभा : पूजा सोनवणे. उपमहानगर अधिकारी :- पश्चिम विधानसभा : वैशाली पगारे, मध्य विधानसभा : रेणू शर्मा. विभाग अधिकारी :- पश्चिम विधानसभा : साक्षी बोरसे, पूर्व विधानसभा : संजना सोनवणे. उपविभाग अधिकारी : पश्चिम विधानसभा : वैष्णवी बैरागी व पूर्व विधानसभा : कविता जोशी.

हेही वाचा:

The post नाशिक : शिवसेनेची जम्बो कार्यकारिणी घाेषित appeared first on पुढारी.