नाशिक : शेतमजुरांना घेऊन जाणारा छोटा हत्ती उलटला, 18 मजूर जखमी

चांदवड अपघात

चांदवड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

चांदवड तालुक्यातील भारत नगर येथील लासलगाव मनमाड रस्त्यावर शेतमजुरांना घेऊन जाणारा छोटा हत्ती उलटल्याने गाडीतील १८ मंजुर जखमी झाले आहेत.  त्यात एकास गंभीर मार लागल्याने मालेगावला हलवण्यात आले आहे. तर चौघांवर मनमाडच्या खासगी दवाखान्यात उपचार सुरू करण्यात आले आहे. तर, किरकोळ जखमींना घरी सोडले आहे.

सध्या पाऊस नसल्याने शेती कामे ठप्प आहेत.  त्यामुळे शेत मजुरांना काम मिळत नसल्याने मिळेल तिकडे कामासाठी जावे लागत आहे. यातूनच हा अपघात झाला.

The post नाशिक : शेतमजुरांना घेऊन जाणारा छोटा हत्ती उलटला, 18 मजूर जखमी appeared first on पुढारी.