नाशिक: शॉर्टसर्किटमुळे आगीत म्हसोबावाडीत घर खाक

पंचवटी www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
म्हसरूळ शिवारातील म्हसोबावाडी येथे शॉर्टसर्किटमुळे बुधवारी 11 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत एका कुटुंबाचा संपूर्ण संसार जळून खाक झाला असून, आजूबाजूच्या तीन घरांचेदेखील नुकसान झाले आहे. म्हसरूळ शिवारातील म्हसोबावाडी या ठिकाणी जवळपास 300 ते 400 कुटुंबांचे वास्तव्य आहे. या भागातील शेवटच्या गल्लीत विकास खरात (वय 32) आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. बुधवारी (दि. 25) सकाळी 11 ला त्यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीचे प्रमाण वाढत गेल्याने आजूबाजूच्या तीन घरांनादेखील त्याची झळ बसली. अग्निशामक दलाला याची माहिती कळवताच फायरमन संजय कानडे, नितीन म्हस्के, मंगेश पिंपळे, मनोहर गायकवाड, वाहनचालक बाळासाहेब काकडे यांनी तत्काळ धाव घेत आग नियंत्रणात आणली. यामुळे पुढील अनर्थ टळला.

संसाराला हातभार कसा लावणार ….
विकास प्रकाश खरात हा मूळ परतूर, परभणी येथील असून, जवळपास 15 ते 20 वर्षांपासून म्हसोबावाडी येथे राहतो. दिंडोरी रोडवरील एका कंपनीत नोकरी करतो. त्यांची बायको रमा विकास खरात शिवणकाम करतात. परंतु आगीत सर्व संसारोपयोगी वस्तू समवेत शिलाई मशीनदेखील जळून खाक झाले आहे. रमा यांच्या पुढे आता मी माझ्या नवर्‍याला संसारात हातभार कसा लावीन, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक: शॉर्टसर्किटमुळे आगीत म्हसोबावाडीत घर खाक appeared first on पुढारी.