नाशिक: साकोरा येथील तरुणाचा खून पैशांच्या वादातून झाल्याचे उघड; दोघांना अटक

file photo

सचिन बैरागी

नांदगाव: तालुक्यातील साकोरा येथील मृत दीपक रमेश कदम (वय ३५) याची पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. दीपक कदम यांची पत्नी मनीषा कदम (रा. साकोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश बाळासाहेब पगार व देवाजी दगा बोरसे (रा. साकोरा, ता. नांदगाव) यांच्याविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nashik News

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील साकोरा वेहळगाव रोडवर मुळ डोंगरी शिवारात रस्त्याच्या कडेला मोटरसायकल आणि एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना मिळाली होती.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवत सदर व्यक्ती दीपक रमेश कदम (रा. साकोरा) येथील असल्याचे निष्पन्न झाले. Nashik News

हा अपघात नसून, हा खून असल्याचे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपींना ताब्यात घेतले. पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून योगेश पगार व देवाजी बोरसे यांनी दीपकच्या डोक्यात दगडाने व लोखंडी रॉडने वार करत निर्घृण खून केल्याचे तपासात समोर आले. आरोपींनी अपघात झाल्याचा बनाव केला होता.

या घटनेचा तपास नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, पोलिस उपअधीक्षक अधिकारी अनिकेत भारती, पोलिस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरक्षक प्रीतम चौधरी, पोलीस हवालदार जगताप, राजू मोरे, कांदळकर खामकर, सचिन मुंडे, दत्तात्रय सोनवणे, अभिमान्यू आहेर यांनी केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा 

The post नाशिक: साकोरा येथील तरुणाचा खून पैशांच्या वादातून झाल्याचे उघड; दोघांना अटक appeared first on पुढारी.