नाशिक : सातपूर गोळीबार प्रकरणात आणखी एक संशयित आरोपी गावठी कट्यासह अटकेत 

गोळीबार
नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
सातपूर औद्योगिक वसाहतीत महिंद्रा सोना कंपनी जवळ रविवार (दि .१९) भरदिवसा  झालेल्या गोळीबार  प्रकरणी  सातपूर पोलिसांनी सोमवार (दि.२७) रात्री गावठी पिस्तुलसह सोमनाथ रघुनाथ झांजर (२१, रा. गंगापूर गाव) या आरोपीस अटक  केली आहे.
झांजर हा मल्हारखान परिसरात असल्याची माहिती वरिष्ठ तपास अधिकारी महेंद्र चव्हाण यांना मिळाली होती. उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ व पथकाने त्यास अटक केली. अंतर्गत  वादातून तपन जाधव व राहुल पवार या युवकांवर  झालेल्या गोळीबार प्रकरणात पाच मुख्य संशयित फरार असताना, सातपूर पोलिसांनी गुन्ह्यात असलेल्या सहभागी प्रकरणी तीन संशयितांना अटक केली आहे. भुषण किसन पवार रोहित मंगलदास अहिरराव (२७) या  संशयित आरोपींना शनिवारी (दि.25) रात्री अटक केली आहे. याप्रकरणी गुन्ह्यात वरीष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण तपास करत असताना सातपूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी पंकज भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली. तर मंगळवारी (दि.28) आज ते चार्ज घेणार आहेत. दरम्यान गोळीबार प्रकरणी मुख्य संशयित हे पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सातपूर गोळीबार प्रकरणात आणखी एक संशयित आरोपी गावठी कट्यासह अटकेत  appeared first on पुढारी.