नाशिक : सिडकोत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन

आंदोलन,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह विधान करून ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. गांधी यांनी केलेले हे वक्तव्य ओबीसी समाज आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केल्याचा आरोप करीत भाजप पदाधिकाऱ्यांनी गांधी यांच्याविराेधात आंदोलन करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले.

राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेतून बाहेर पडले नसल्याचे या वक्तव्यावरून स्पष्ट दिसते. तसेच न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याऐवजी काँग्रेसचे नेते त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आंदोलने करून न्यायालयाचा अवमान करत आहे. भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने सिडको येथील त्रिमूर्ती चौकात राहूल गांधी यांच्या पुतळ्यास जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात आला.

राहुल गांधी यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा भारतीय जनता पक्ष त्यांच्या विरोधात आंदोलन तीव्र करेल, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी दिला. या आंदोलनाप्रसंगी शहर संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, भाजप नेते महेश हिरे, अविनाश पाटील, शिवाजी बरके, भगवान काकड, कैलास आहिरे, काशीनाथ शिलेदार, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, राकेश ढोमसे, डॉ. वैभव महाले, डाॅ. चंचल साबळे, राहुल गणोरे, यशवंत नेरकर, प्रकाश चकोर, अशोक पवार, प्रतिभा पवार, अलका अहिरे, छाया देवांग, संतोष नेरे, ॲड. अजिंक्य साने, अनिल मटाले, रवि पाटील, शंतनू शिंदे, राहुल गणोरे, डॉ. चंचल साबळे, शैलेश साळुंखे, भाविक तोरवणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : सिडकोत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन appeared first on पुढारी.