नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; 2857 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान व मतमोजणीसाठी निवडणूक विभागाने नियोजन केले असून, आठ मतदान केंद्रांवर सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी व हमाल मापारी अशा चार गटांतील 2857 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना सौंदाणे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांनी माहिती दिली.

मतदान केंद्रनिहाय गावे अशी…

ब. ना. सारडा विद्यालय सिन्नर – भाटवाडी, कुंदेवाडी, लोणारवाडी, दातली, मनेगाव, मुसळगाव, वडगाव सिन्नर, सरदवाडी, सिन्नर बहुउद्देशीय सिन्नर, चिंचोली, मोह, माळेगाव, जामगाव, पास्ते, नायगाव, जायगाव, देशवंडी, ब्राह्मणवाडे, जोगलटेंभी, वडझिरे, सोनगिरी, गोंदे, धोंडवीरनगर, खोपडी बुुद्रुक, हरसुले, बारागाव पिंप्री, पाटपिंप्री, खुळेवाडी.

जिल्हा परिषद शाळा वावी – वावी, आशापूर (घोटेवाडी), मर्‍हळ बुद्रुक, मर्‍हळ खुर्द, मलढोण, सायाळे, मिठसागरे, निर्‍हाळे, पांगरी बुद्रुक, पांगरी खुर्द, दुशिंगपूर (दुसंगवाडी), फुलेनगर (माळवाडी), शिवाजीनगर (कहांडळवाडी), पिंपरवाडी, सुरेगाव, भोकणी.

जिल्हा परिषद शाळा शहा – शहा, दहीवाडी, पंचाळे, कारवाडी, कोळगाव माळ, धनगरवाडी, रामपूर (पुतळेवाडी), श्रीरामपूर, उज्जनी, विघनवाडी, भरतपूर, वारेगाव, महाजनपूर, लक्ष्मणपूर, शिंदेवाडी, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, मिरगाव.

जिल्हा परिषद शाळा डुबेरे – डुबेरे, डुबेरेवाडी, आटकवडे, कोनांबे, सोनांबे, सोनारी, पाटोळे, रामनगर, ठाणगाव, आडवाडी, हिवरे, पिंपळे, पाडळी, टेंभुरवाडी.

जनता विद्यालय मविप्र पांढुर्ली – आगासखिंड, बेलू, पांढुर्ली, बोरखिंड, घोरवड, शिवडे, विंचुरी दळवी, सावतामाळीनगर, वडगाव पिंगळा, औंढेवाडी, धोंडबार, चंद्रपूर/खापराळे.

जिल्हा परिषद शाळा वडांगळी – वडांगळी, कीर्तांगळी, खडांगळी, मेंढी, चोंढी, सोमठाणे, सांगवी, कोमलवाडी, घंगाळवाडी, देवपूर, फर्दापूर, धारणगाव, निमगाव देवपूर, हिवरगाव, निमगाव सिन्नर, के.पा. नगर, गुळवंच.

जिल्हा परिषद शाळा नांदूरशिंगोटे – नांदूरशिंगोटे, दोडी बुद्रुक, दोडी खुर्द, कणकोरी, मानोरी, नळवाडी, कासारवाडी, भोजापूर-सोनेवाडी, चास, दापूर, चापडगाव, धुळवड, खंबाळे, दत्तनगर (दापूर), शिवाजीनगर (माळवाडी). तसेच सर्व व्यापारी व हमाल-मापारी यांचे मतदान ब. ना. सारडा विद्यालय सिन्नर येथे होणार आहे. सोसायटी गटात 1271, ग्रामपंचायत -1063, व्यापारी-171, हमाल मापारी-352 असे एकूण 2857 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

आठवडे बाजार बंद, लिलाव बंद
बाजार समितीसाठी शुक्रवारी (दि.28) मतदान होणार असून, तत्काळ मतमोजणी सुरू होईल. तथापि, नांदूरशिंगोटे येथे मतदान केंद्र असल्याने त्या दिवशीचा तेथील आठवडे बाजार व बाजार समितीचे शेतमाल लिलाव बंद राहणार असल्याची माहिती श्रीमती सौंदाणे व गायकवाड यांनी दिली. त्यामुळे शेतकर्‍यांनी शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. मतदानाच्या चोवीस तास अगोदर म्हणजेच गुरुवारी (दि.27) सकाळी 8 वाजता प्रचार थांबणार आहे.

डॉ. आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात मतमोजणी
शुक्रवारी (दि.28) सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मतदान होणार असून, त्यानंतर मतमोजणी होणार आहे. वावी वेस भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक कला व क्रीडा सभागृहात मतमोजणी करण्यात येईल. साधारणपणे सात टेबलांवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रियेत तालुक्यातील एकही कर्मचार्‍याचा समावेश नाही. निफाड व दिंडोरी तालुक्यांतील सचिवांची मतदान अधिकारी व कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी करून निकाल हाती येण्यास साधारणपणे रात्रीचे 11 वाजण्याची शक्यता निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. हे मुख्य निरीक्षक असून, तहसीलदार एकनाथ बंगाळे सहायक निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; 2857 मतदार बजावणार मतदानाचा हक्क appeared first on पुढारी.