नाशिक : ‘सुंदर माझा दवाखाना’ मोहिमेला वणीत प्रारंभ

wani www.pudhari.news

वणी : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाकडून जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित ‘सुंदर माझा दवाखाना’ या मोहिमेला वणी ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी (दि. ७) विविध उपक्रमांनी उत्साहात सुरुवात झाली.

दरवर्षी ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. ‘समान आरोग्य सेवा’ हे यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य आहे. शासकीय रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये सर्वांना समान सुविधा उपलब्ध करून जास्तीत जास्त रुग्णांनी सार्वजनिक रुग्णांलयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे, याविषयी जनजागृतीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने या निमित्त यंदा राज्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबवत दि. ७ ते १४ एप्रिल दरम्यान ‘सुंदर माझा दवाखाना’ हा उपक्रम राबवित आहे.

आरोग्य समितीचे रविकुमार सोनवणे, जमीर शेखे, ग्रामपंचायत सदस्य विजय बर्डे, वणी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल पवार, डॉ. कटारिया, दिगंबर पाटोळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रमाची सुरुवात झाली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. एन. मोरे यांनी उपक्रमाची माहिती दिली. यावेळी रुग्णालयात व रुग्णालयाच्या आवारात स्वच्छता केली. रुग्णालयातील विविध कक्षांचे नूतनीकरण व स्वच्छता, शासनाच्या आरोग्यविषयक उपक्रमाचे माहिती फलक, पथदीपांचे विद्युतीकरण, रंगरंगोटी आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल महाले, नेत्र चिकित्सा अधिकारी शरद आहेर, समुपदेशक तुषार दुसाने, सहायक अधीक्षक के. के. महाले, रश्मी शिर्के, संगीता शिरसाठ, वृषाली खाडे, जयश्री गावित, स्वाती उबाळे, ऋतुजा राजगिरे, कापसे, अनिता गांगुर्डे, वर्षा महाले, काशीनाथ गावित, आकाश सोलंकी, देवराम वायखंडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : 'सुंदर माझा दवाखाना' मोहिमेला वणीत प्रारंभ appeared first on पुढारी.