नाशिक : सोशल मीडियावर नोकरी शोधणं महिलेला पडलं महागात

सोशल मीडिया ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सोशल मीडिया माध्यमातून नोकरी शोधणे एका महिलेस महागात पडले आहे. भामट्याने महिलेस नोकरी देण्याचे आमिष दाखवून सहा लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

महात्मानगर परिसरातील ३४ वर्षीय रहिवासी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिला भामट्याने फेब्रुवारी महिन्यात गंडा घातला. महिलेस टेलिग्रामवरील ‘मनी मेक सिंपल’ या ग्रुपमधून भामट्याने संपर्क साधला. महिलेस पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दाखवून त्याने वेगवेगळ्या कारणांनी महिलेकडे पैशांची मागणी केली. त्यानुसार महिलेने ऑनलाइन पद्धतीने भामट्यास सहा लाख ४० हजार ५४० रुपये दिले. मात्र नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तिच्याशी संपर्क साधणाऱ्यासह ज्याच्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले त्याच्याविरोधात सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : सोशल मीडियावर नोकरी शोधणं महिलेला पडलं महागात appeared first on पुढारी.