ना. अब्दुल सत्तार : सीमावादाबाबत सर्वांनी एकत्र यावे

राज्यमंत्री अब्दुल सत्तार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नाबाबत दोन्ही राज्यात वातावरण चांगलेच पेटले आहे. त्यातच आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, ज्येष्ठ नेते शरद पवार हे सीमावाद प्रश्नात पुढाकार घेत आहेत, सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा. पवार यांना या प्रश्नाची जाण आहे. ते या प्रश्नात पुढाकार घेत असून, त्यात राज्याचे हित सामावलेले असल्याचे म्हटले आहे.

कृषी महोत्सवास भेट देण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार नाशिक दौर्‍यावर होते. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सीमावादाचा गंभीर प्रश्न अनेक दिवसांपासून आहे. दोन्ही राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे आणि केंद्रातदेखील तेच सरकार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यात लक्ष घालावे. त्यांच्या मध्यस्थीने हा प्रश्न सुटू शकतो. परंतु कर्नाटक सरकारने आरे केलं तर महाराष्ट्रातील जनता कारे केल्याशिवाय राहणार नाही. सीमावाद प्रश्नावरून मराठी माणसाची अडवणूक केली तर महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशारादेखील यावेळी दिला गेला. नाहीतर मी माजी आमदार झालो असतो. आम्ही वेळीच बाहेर पडूून राज्यात आमचा गट स्थापन केला आणि सत्तेत आलो. जर तसे केले नसते तर मी माजी आमदार झालो असतो. मला तसे होऊ द्यायचे नव्हते. मला लोकांमधून पुन्हा निवडून यायचे आहे, असे म्हणत सत्तारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला. म्हणून मंत्रीमंडळ विस्तार लांबला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुजरात येथील विधानसभा निवडणूकीमध्ये व्यस्त होते त्यामुळे राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकला नाही. मात्र, आता ते आले आहेत त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळाचा विस्तार करतील, असे देखिल सत्तारांनी सांगितले.

हेही वाचा:

The post ना. अब्दुल सत्तार : सीमावादाबाबत सर्वांनी एकत्र यावे appeared first on पुढारी.