निळवंडी शिवारात वनविभागाकडून बिबट्या जेरबंद

बिबट्या जेरबंद,www.pudhari.news

दिंडोरी(जि. नाशिक) : तालुक्यातील निळवंडी शिवारात चार ते पाच दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले होते. अखेर त्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

उप वनसंरक्षक पुर्व भाग नाशिक उमेश वावरे, सहाय्यक वन संरक्षक पुर्व भाग नाशिक अनिल पवार यांच्या मार्ग दर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी दिंडोरी पुजा जोशी, वनपाल अशोक काळे, रेंज मधील सर्व वनरक्षक स्टाफ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्नशील होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मागील सात दिवसांत केलेल्या प्रयत्नात आज निळवंडी शिवारात चिंच ओहोळ नाल्यात लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. हा बिबट्या मुलगा मयत झालेल्या घटनास्थळापासून 800 मीटरच्या अंतरावर जेरबंद करण्यात आला असून याच बिबट्याने मुलावर हल्ला केला आहे. परिसरात अजूनही बिबट्यांचा वावर असल्याने नागरिकांनी खबरदारी बाळगावी असे वन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post निळवंडी शिवारात वनविभागाकडून बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.