पिंपळनेर : चारचाकी वाहनातून पकडली अवैध मद्य तस्करी

पिंपळनेर www.pudhari.news

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
चारचाकी वाहनामधून होणारी मदयाची तस्करी रोखण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे. पिंपळनेर-नवापूर रस्त्यावरील उमरपाटा गावाजवळ देशी-विदेशी दारु व चारचाकी वाहनासह १ लाख ३५ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून संशियत एकास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळनेर नवापूर रस्त्यावरुन चारचाकी वाहनामधून मद्याची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सापळा लावून उमरपाटा गावाजवळ संशयित वाहन (एमएच ०५/ एजे- ७५७९) ताब्यात घेतली. या वाहनामध्ये देशी- विदेशी दारुचा साठा मिळून आला आहे. या कारवाईत १३ हजार ४४० रूपये किमतीच्या ४८ टॅगो पंचच्या १९२ बाटल्या, १५ हजार ३६० रुपये किमतीच्या इम्पोरियल ब्ल्यू कंपनीच्या प्रत्येकी ६० रुपये किमतीच्या ९६ बाटल्या, ६ हजार २४० रुपये किमतीच्या बिअरच्या ४८ बाटल्या व १ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण १ लाख ३५ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहनचालक सुरज सुदाम वळवी (२३, रा. वार्सा ता.साक्री) यास ताब्यात घेण्यात आले आहे. तर याप्रकरणी पोलीस कॉन्सटेबल पंकज माळी यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्रोव्हिजन ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक उपनिरीक्षक बी.आर.पिंपळे, हेड कॉन्सटेबल चौधरी, पोलीस कॉन्सटेबल पंकज माळी, आकाश माळी, पंकज वाघ यांच्या पथकाने केली आहे.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : चारचाकी वाहनातून पकडली अवैध मद्य तस्करी appeared first on पुढारी.