पिंपळनेर : मुलीला त्रास देणाऱ्या जावयाला मारहाण; चौघांवर खूनाचा गुन्हा दाखल

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

मुलीला सतत त्रास देतो म्हणून सासरच्या मंडळींनी जावयास बेदम मारहाण केली. यात जावई जागीच ठार झाल्याची घटना साक्री तालुक्यातील चिंचपाडा येथे घडली. हत्येप्रकरणी सासू, सासरे, शालक आणि मयताच्या पत्नीविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.

मयताचे आजोबा लक्ष्मण कुची बर्डे (रा. काकसेवड, ता.साक्री) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा नातू अजय बर्डे (रा.चिंचपाडा) यांची पत्नी सुंदरबाई हिच्याशी नेहमी भांडण व्हायचे. जावई त्रास देत असल्याने जाब विचारण्यासाठी सासरचे लोक मांजरीहून चिंचपाडा येथे आले. सोमवारी (दि. 20) सकाळी ७ च्या सुमारास मारहाणीच्या विषयावरून पुन्हा त्यांच्यात वाद उफाळला. हा वाद विकोपाला गेला की, अजयला त्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी संशयितांनी त्याचा गळा आवळून खून केला. फिर्यादीवरून मयत अजयचे सासरे शांताराम हाट्या माळचे, डॅनियल शांताराम माळचे, सासू शांताराम माळचे, (तिघे रा. मांजरी) पत्नी सुंदरबाई बर्डे यांच्याविरुद्ध पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सर्व आरोपी जेरबंद झाले असून सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रदीप सोनवणे हे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : मुलीला त्रास देणाऱ्या जावयाला मारहाण; चौघांवर खूनाचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.