पिंपळनेर येथे श्रीराम मंदिर अक्षदा कलशाची शोभायात्रा

अक्षदा कलशाची शोभायात्रा www.pudhari.news

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा ;  प्रभू श्रीरामाचा जयघोष अयोध्या नगरी येथून आलेल्या अक्षता कलशाची शोभायात्रा पिंपळनेर शहरात काढण्यात आली. शोभायात्रा मार्गात राहणाऱ्या सर्व महिलांनी, नागरिकांनी रांगोळी काढून शोभायात्रेचे स्वागत केले.

महिलांनी अक्षदा कलशाचे पुजन करून दर्शनाचा लाभ घेतला. रामभक्तांकडुन होणारा श्रीरामाचा जयघोष करीत टाळमृदुंगाच्या तालावर श्रीराम भक्त तल्लीन झाले होते. प्रभुश्रीरामाच्या जयघोषाने पिंपळनेर नगरी दुमदुमली होती. मंगल वाद्यांच्या सुरात शहरातील श्रीराम मंदिर, टेंभारोड, इंदिरानगर हनुमान मंदिर, पोलीस स्टेशन, बस स्टॅन्ड, विश्वनाथ चौक, होळी चौक, भोई गल्ली, महाराणा प्रताप चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, नाना चौक, न्हावी हुडा, मुरलीधर मंदिर, एखंडे गल्ली, गोपाळ नगर, बाजारपेठ, गांधी चौक, माळी गल्लीतून श्रीराम मंदिरात शोभायात्रा विसर्जित करण्यात आली.

हेही वाचा :

The post पिंपळनेर येथे श्रीराम मंदिर अक्षदा कलशाची शोभायात्रा appeared first on पुढारी.