बैल धुण्यासाठी गेलेला तरुणाचा कुसुर येथील पाझर तलावात बुडून मृत्यू

कुसूर

येवला, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कुसुर येथे एका ३२ वर्षीय तरुणाचा बैल धुण्यासाठी पाझर तलाव येथे गेल्यानंतर बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बळीराजाचा बैलांचा महत्त्वाचा सण असलेला पोळा सणाला गालबोट लागले असून मधुकर उत्तम गायकवाड (रा. कुसूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. बैलपोळा सणाच्या दिवशी दुर्दैवी घटना घडल्याने कुसुर गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, परिसरातील पोहणाऱ्य़ा तरुणांच्या मदतीने दोन ते तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह हाती लागला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी ऋतिक उगले, जयवंत चव्हाण, अभिषेक चव्हाण, गुड्डू हिंगे यांच्या सह बाळासाहेब पवार, सरपंच संजय गायकवाड गोरख आबा पवार दीपक गायकवड पोलीस पाटील मनोहर गायकवाड यांनी सहकार्य केले.

हेही  वाचलंत का?

The post बैल धुण्यासाठी गेलेला तरुणाचा कुसुर येथील पाझर तलावात बुडून मृत्यू appeared first on पुढारी.