मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी; हे वक्तव्य म्हण म्हणूनच इतिवृत्तात घ्यावे

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

पुरवणी मागण्यांवर बोलताना मुंबईच्या प्रश्नांबाबत मुद्दे मांडत असताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी “पूर्वी असे म्हणत असत की “मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे” असे वक्तव्य केले होते मात्र यावर सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता. मात्र हे वक्तव्य हे चुकीचे नाही आणि हे वक्तव्य म्हण म्हणूनच इतिवृत्तात घ्यावे असे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज विधिमंडळाच्या सभागृहात महाराष्ट्र विधानसभा नियम ४८ अन्वये स्पष्टीकरण दिले.

छगन भुजबळ यांनी पुरवणी मागण्या दरम्यान वापरलेल्या म्हणी बाबत महाराष्ट्र विधानसभा नियम ४८ अन्वये स्पष्टीकरण दिले. यावेळी छगन भुजबळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दरेकर, आमदार योगेश सागर यांनी ही आपल्या भाषणात ही म्हण वापरली असल्याचा दाखला देखील असल्याचे इतिवृत्त सभागृहासमोर ठेवले. तसेच या दाखल्यांप्रमाणे मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे या वाक्याचा म्हण म्हणूनच इतिवृत्तात समावेश करावा असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

या वक्तव्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत छगन भुजबळ यांच्या स्पष्टीकरणाचे समर्थन केले. तसेच सभागृहात बोलतांना म्हणींचा वापर केल्यानंतर त्याचा कुणीही वेगळाअर्थ घेऊ नये असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा :

The post मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी; हे वक्तव्य म्हण म्हणूनच इतिवृत्तात घ्यावे appeared first on पुढारी.