रक्तदान दिन विशेष : अर्पण रक्तपेढीकडून 250 थॅलेसेमिया रुग्ण दत्तक

रक्तदान www.pudhari.news

नाशिक : दीपिका वाघ
अन्नग्रहण केल्यानंतर शरीरात रक्त तयार होते, तीच रक्त तयार होण्याची प्रक्रिया थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या शरीरात तयार होत नाही. त्यामुळे त्या रुग्णांना दर आठ ते दहा (रुग्णाच्या प्रकृतीनुसार) दिवसांनी रक्त द्यावे लागते. यासाठी नाशिकमधील अर्पण रक्तपेढीने 8 मे 2012 पासून थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत रक्त देण्यासाठी थॅलेसेमिया सेंटर सुरू केले. त्यासाठी त्यांना महिन्याला 500 रक्तपिशव्यांची आवश्यकता भासते.

अर्पण रक्तपेढीने 250 थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना दत्तक घेतले आहे. त्यांची नियमित तपासणी करून 6-10-15 दिवसांनी रुग्णांना मोफत रक्त दिले जाते. या रुग्णांना नियमित रक्त मिळाले तरच ते जिवंत राहू शकतात. रक्तपेढीच्या या उपक्रमामुळे अनेक थॅलेसेमिया रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची बाधा झाली नाही. हैदराबाद, जळगाव, धुळे, कळवणसारख्या भागांतून रुग्ण पूर्वी रक्त घेऊन जायचे पण दुसर्‍या रुग्णालयात रक्त चढवण्यासाठी त्यांच्याकडून शुल्क आकारले जायचे. त्यामुळे अर्पण रक्तपेढीने छोटेसे सेंटर सुरू केले. यामुळे रुग्ण रक्तपेढीत येऊन तपासणी करून त्यांना तिथेच रक्त दिले जाते. नाशिकसह राज्यात अर्पण रक्तपेढीच्या शाखा कार्यरत असून, अनेक वर्षांपासून रक्तपेढी क्षेत्रात लौकिक टिकवून आहे. अर्पणला राज्य सरकारने गौरविले असून, विविध संस्था-संघटनांनी सन्मानित केले आहे.

रक्तदाता दिनाचे प्रयोजन
रक्तगट प्रणालीचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टेनर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. या संशोधनाबद्दल त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले होते. 2005 पासून 14 जून जागतिक रक्तदाता दिन लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी थीमनुसार साजरा केला जातो. यावर्षीची थीम ॠर्ळींश इश्रेेव, ॠर्ळींश झश्ररीार, डहरीश ङळषश, डहरीश जषींशप आहे.

रक्तदान का करावे
नियमित रक्तदान केल्याने वजन नियंत्रणात राहते. रक्त पातळ राहते. त्यामुळे रक्तदाब, कर्करोग होण्याची भीती नाहीशी होते. रक्तदाब, मधुमेह, थॉयराइड, लस घेतली असेल, आजारी, नुकतीच शस्त्रक्रिया झालेले व्यक्ती रक्तदान करू शकत नाही. रक्तदान करण्यापूर्वी व्यक्तीची पूर्ण तपासणी केली जाते त्यानंतरच रक्तदान करता येते.

थॅलेसेमिया पीडित रुग्णांसाठी रक्तपेढीने अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या माध्यमातून मोठे काम उभे केले आहे. थॅलेसेमियामुक्त भारत हे ध्येय अर्पण परिवाराने समोर ठेवले आहे. – डॉ. नंदकिशोर तातेड, चेअरमन, अर्पण रक्तपेढी.

हेही वाचा:

The post रक्तदान दिन विशेष : अर्पण रक्तपेढीकडून 250 थॅलेसेमिया रुग्ण दत्तक appeared first on पुढारी.