रामनवमी – 2023 : सातपूरला राम जन्मोत्सव साजरा

सातपूर www.pudhari.news

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
येथील अशोकनगरमधील गायत्री कॉलनीतील श्रीराम मंदिर येथे आठवा वर्धापनदिन व रामनवमी निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

बुधवारी (दि.२९) रोजी दु. ४ वाजता पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. तसेच रात्री ८ वाजता युवाकीर्तनकार खुशाली उगले यांचे कीर्तन झाले. गुरुवार (दि.३०) रोजी सकाळी ९ वाजता होमहवनपूजा, तर १० वाजता ह.भ.प. कांचन शिवानंद शेळके यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ वाजता उत्साहात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर १ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आल्याने रक्तदात्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. श्रीराम गायत्री कला  क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री दक्षिणमुखी इच्छापूर्ती साईनाथ मंदिर
श्री दक्षिणमुखी इच्छापूर्ती साईनाथ मंदिराच्या वतीने देखील बुधवार (दि.२९) रोजी सायं. ७ वाजता साईलीला महानाट्य आयोजित करण्यात आले होते. गुरुवार (दि.३०) रोजी रामजन्मोत्सव निमित्ताने रामरथ सोहळाचे आयोजन करण्यात आले. सातपूर कॉलनी भागातून रामरथाचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

हेही वाचा:

The post रामनवमी - 2023 : सातपूरला राम जन्मोत्सव साजरा appeared first on पुढारी.