नाशिक : राज्य बेसबॉल स्पर्धेसाठी नाशिकचा संघ रवाना

बेसबॉल www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अमरावती येथे होणाऱ्या १४ व्या महाराष्ट्र राज्य बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिकचा संघ रवाना झाला. संघाच्या कर्णधारपदाची धुरा राष्ट्रीय खेळाडू मोहित भामरे याच्यावर सोपविण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदी रोहित पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संघात व्दिज साळवी, वेदांत बैरागी, ओम सहाणे, अपूर्व पाटील, ऋषिकेश पवार, ओम भापकर, रुद्र पाळदे, सुमित चव्हाण, शुभम कराळे, ओमकार उदमले, रोहित कुमावत आणि सूरज खंदारे आदींचा समावेश आहे. या संघाचे मार्गदर्शक म्हणून विशाल खंदारे आणि इंद्रजित पलुस्कर तर संघ व्यवस्थापक म्हणून कौस्तुभ रावळ हे काम बघणार आहेत. निवड झालेल्या खेळाडूंचे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक राजू शिंदे, ओमकार परसपत्की, अर्जुन टिळे, आनंद खरे आदींनी काैतुक केले.

हेही वाचा:

The post नाशिक : राज्य बेसबॉल स्पर्धेसाठी नाशिकचा संघ रवाना appeared first on पुढारी.