रामरावदादा पाटील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी

पिंपळनेर : (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील माळमाथा परिसरातील जैताणे-निजामपूर येथील मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त रामरावदादा पाटील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या सुमारे शंभरावर विद्यार्थी-विद्यार्थिनींची नुकतीच मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली. मातोश्री सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी आश्रमशाळेच्या इयत्ता पहिली ते दहावीच्या सुमारे शंभरावर गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोफत रक्तगट तपासणी झाली. आंतरराष्ट्रीय मानवी हक्कदिनानिमित्त रामरावदादा पाटील आश्रमशाळेत मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे नुकताच हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. नवजीवन पॅथॉलॉजी लॅबचे टेक्निशियन सचिन वाघ व दिनेश देवरे यांच्यासह वसतिगृह अधीक्षक संजय खैरनार, वसतिगृह अधिक्षिका रूपाली माळी व सामाजिक कार्यकर्ते भैय्या गुरव यांचा यावेळी मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते भैय्या गुरव यांनी रक्तगट तपासणी शिबीरस्थळी भेट देऊन विधायक उपक्रम राबविल्याबद्दल मातोश्री सेवाभावी संस्थेचे विशेष कौतुक केले.प्रा.जगदाळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. “समाजातील दुर्बल, दुर्लक्षित व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मातोश्री सेवाभावी संस्था अविरतपणे विधायक सामाजिक उपक्रम राबवित असते व यापुढेही समाजकार्य निरंतर सुरू राहील,”असे संस्थेचे अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे यांनी सांगितले. संस्थेचे सचिव सुशीलकुमार जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

नवजीवन पॅथॉलॉजी लॅबचे संचालक तुषार जगदाळे,लॅब टेक्निशियन सचिन वाघ व दिनेश देवरे यांच्यासह मातोश्री सेवाभावी संस्थेचे सचिव सुशीलकुमार जगदाळे, संचालक भारत जाधव, विवेक जगदाळे यांनी रक्तगट तपासणीसाठी विशेष परिश्रम घेतले. रामरावदादा पाटील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब बच्छाव, गुलाबराव दाभाडे, अधीक्षक संजय खैरनार, अधिक्षिका रूपाली माळी, तुकाराम खलाणे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

हेही वाचा :

The post रामरावदादा पाटील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी appeared first on पुढारी.