राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ पिंपळनेरला काँग्रेसची निदर्शने

पिंपळनेर,www.pudhari.news

पिंपळनेर: (जि. धुळे) पुढारी वृत्तसेवा

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी दहा वाजता कालिका मंदिरापासून निदर्शने करीत रॅली काढून शहरातील सामोडे चौफुलीवर आंदोलन छेडले. तसेच रस्तारोको केला. केंद्रातील भाजपा सरकारने हुकूमशाही तंत्राचा वापर करीत राहुल गांधी याची खासदारकी रद्द केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, मा.खासदार बापूसाहेब चौरे, मा.आमदार वसंतराव सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, सभापती शांताराम कुवर, मा.पंस.सदस्य प्रकाश पाटील, मा.सभापती जगदीश चौरे, डोंगर बागुल, प्रविण चौरे, तालुका किसान अध्यक्ष कपिल जाधव, सचिन शिंदे, एकनाथ गुरव, पंस.सदस्य रमेश गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा यशस्वी झाली. देशातील कोट्यवधी जनता काँग्रेसशी जोडली गेली. हीच भीती भाजपवाल्यांना सतावू लागल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. मात्र, काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही, तर यापुढे आक्रमकपणे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी दिला. मा. खासदार बापूसाहेब चौरे, भानुदास गांगुर्डे, प्रकाश पाटील, पांडुरंग सूर्यवंशी आदींनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले.

निषेध आंदोलनात प्रविणचौरे, मा.सभापती गणपत चौरे, जिप.सदस्य विश्वास बागुल, कॉग्रेसचे उपाध्यक्ष पंकज सूर्यवंशी, जयेश खैरनार, मेश सूर्यवंशी, अविनाश शिंदे, सागर देसले, हिरालाल देसाई, शांताराम अहिरे, अनिल गायकवाड, रविंद्र मालुसरे, आबा पाथरे, राष्टवादीचे शहर अध्यक्ष सतिश पाटील, महिला आघाडीच्या लताबाई पवार, शुभम गांगुर्डे, रावसाहेब खैरनार, अमोल ठाकरे, गणेश गावित, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष अप्सर सैय्यद, नारायन भदाणे, गफ्फार शहा, जफर शेख, गोकुळ गवळी, चंदू साबळे, श्रीराम पवार आदींसह कॉंग्रेस प्रणित विविध संघटना आंदोलनात सहभागी  झाल्या. कार्यक्रमाचे आयोजन प्रविणचौरे, भानुदास गांगुर्डे यांनी केले.

हेही वाचा ; 

The post राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ पिंपळनेरला काँग्रेसची निदर्शने appeared first on पुढारी.