शेतकऱ्यांनो द्राक्षबागांना बसवा प्लास्टिक कव्हर, सरकारने आणली योजना ; असा घ्या योजनेचा लाभ

Plastic cover scheme ,www.pudhari.news

सुनील थोरे

चांदवड (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा 

अवकाळी पाऊस व गारपीट या नैसर्गिक संकटांपासून द्राक्षपिकाचे संरक्षण होण्यासाठी चालू वर्षापासून राज्य शासनाने संरक्षित शेती अंतर्गत प्लास्टिक कव्हर( Plastic cover scheme) योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

दरवर्षी होणारा अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. अशा परिस्थिती शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने चालू वर्षापासून संरक्षित शेती अंतर्गत द्राक्षपिकासाठी प्लास्टिक कव्हर (Plastic cover scheme) ही योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत नैसर्गिक आपत्तीपासून द्राक्षबागांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने तसेच उच्च दर्जाचे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन होण्यासाठी आर्थिक साहाय्य करणे व शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकरिता प्रोत्साहन देणे तसेच ग्रामीण भागातील युवकांना कृषी क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे या उद्देशाने संरक्षित शेती अंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे अवाहन शेतकऱ्यांना केले आहे.

शेतकऱ्यांनो असा करा अर्ज ….(Plastic cover scheme)

योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी प्रणालीवरhttps://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. तर लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या स्वत:च्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. मालकीची जमीन नसल्यास शेतकऱ्यांचा आपसातील भाडेपट्टा करार या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही, तथापि शेतकऱ्याने शासकीय अथवा निमशासकीय घेतलेल्या जमिनीवर द्राक्षपिकासाठी प्लास्टिक पीक तंत्रज्ञानाचा वापर करायचा असल्यास दीर्घ मुदतीचा (किमान १५ वर्षे) व दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत केलेला भाडेकरार या योजनेत ग्राह्य धरण्यात येणार आहे.

यांना मिळणार लाभ

योजने अंतर्गत वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या, शासकीय, निमशासकीय व अशासकीय संस्था यांना या योजनेचा लाभ घेता येईल. विशेष म्हणजे फक्त द्राक्षबागेसाठी योजनेचा होणार मिळणार असून, प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानाचा वापर द्राक्षबागांसाठीच अनिवार्य राहणार आहे.

बदलत्या हवामानाचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच बसतो. ही योजना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

– विलास सोनवणे, तालुका कृषी अधिकारी, चांदवड

हेही वाचा : 

The post शेतकऱ्यांनो द्राक्षबागांना बसवा प्लास्टिक कव्हर, सरकारने आणली योजना ; असा घ्या योजनेचा लाभ appeared first on पुढारी.