सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण तज्ज्ञ डॉ विश्वंभर चौधरी : ‘निर्भय बनो’ कार्यक्रमात व्याख्यान

निर्भय बनो pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

भाजपने मुजोरीच्या सर्व पायऱ्या ओलांडल्या आहेत. रामभक्त म्हणणाऱ्या भाजपच्या किती कार्यकर्त्यांना रामरक्षा येते? आम्ही रामाचे हिंदू असून भाजपवाले नथुरामाचे हिंदू आहेत. राम सत्यवचनी होते, भाजपचा एक तरी नेता खरे बोलतो का ? असा रोखठोक सवाल सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी यांनी उपस्थित केला.

सिन्नर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या प्रांगणात ‘निर्भय बनो’ (Nirbhay Bano) या कार्यक्रमांतर्गत ‘लोकशाही वाचविण्यासाठी आणि संविधान टिकवण्यासाठी’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सिन्नर येथील सुमारे ३५ विविध संघटनांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे, पत्रकार निखिल वागळे उपस्थित होते. ॲड. असीम सरोदे यांनी, नागरिक म्हणून विचार करणाऱ्यांची भारत देशाला गरज असल्याचे सांगितले. आम्ही करणारी भाषणे आक्षेपार्ह असल्याचे हे सांगणारे कोण, असा सवाल त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना उपस्थित केला. भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांनी आतापर्यंत केलेल्या विविध हल्ल्यांची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली. सीबीआय ईडी यांच्या कारवाईवर त्यांनी प्रश्नांची नाव उपस्थित केले. संभाजी भिडे विषारी लोक बनवत असून त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होत नसल्याचे टीकास्त्र सोडले. निर्भय बनवला मिळणारा प्रतिसाद लोकांच्या मनातला राग असल्याचे ते म्हणाले लोकशाहीच्या आवाज भाजप दाबू शकणार नाही, आगामी निवडणुकीत भाजप येणार नसल्याचे ते म्हणाले. डॉ. डी. एल. कराड, निखिल वागळे यांनी मनोगत व्यक्त केले. महामित्र परिवाराचे दत्ता नई वायचळे यांनी प्रास्तविक केले. (Nirbhay Bano)

आमचा देव राजकारणाला वापरण्यावर विरोध
भाजपकडे दाखवण्यासाठी काम नसल्याने २०२४ च्या निवडणुकीत रामाशिवाय पर्याय नसल्याने निवडणुकीसाठी रामाला वेठीस धरल्याचा आरोप त्यांनी केला. आमचा देव राजकारणाला वापरण्यावर आमचा विरोध असल्याचे ते म्हणाले, पौष महिन्यात प्राणप्रतिष्ठा केली. राष्ट्रपतींना या कार्यक्रमापासून दूर ठेवले असा आरोपही त्यांनी केला. डॉ. चौधरी यांनी शहा-मोदी व भाजपवर जहरी टीका करीत हा भगवा वारकरी पंथाचा असून त्यावर उत्तरेकडील महाराज हल्ले करीत असल्याचे ते म्हणाले.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये
श्रीराम व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलू नका हे सांगणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असे चौधरी म्हणाले, राष्ट्रपित्याची हत्या करणारी विचारधारा आपल्याला राष्ट्रवाद कसा शिकवू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राम ही भाजपची खासगी मालमत्ता नसून हिंदू कोड बिलाची होळी का केली, हे सांगा आणि मग हिंदुत्वावर बोला असे आव्हान त्यांनी भाजपला दिले. (Nirbhay Bano)

हेही वाचा:

The post सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण तज्ज्ञ डॉ विश्वंभर चौधरी : 'निर्भय बनो' कार्यक्रमात व्याख्यान appeared first on पुढारी.