नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल यांनी नाशिक तालुक्यातील काही प्रातिनिधिक विद्यार्थ्यांना दिव्यांग यूडीआयडी प्रमाणपत्र वाटप केले. जिल्ह्यात दिव्यांग असलेल्यांसाठी प्रशासन योग्य ती कार्यवाही करत आहे. त्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, उपशिक्षणाधिकारी एस. एन. झोले, समावेशित शिक्षण जिल्हा समन्वयक सुरेखा पाबळकर, सहायक कार्यक्रम अधिकारी सुनील दराडे, प्रवीण जाधव, विशेष तज्ज्ञ प्रतिभा लोखंडे, वैशाली गावित उपस्थित होते.
हेही वाचा:
- ‘तिथे’ विकतो जळालेला पाव!
- बिबवेवाडी : अवजड वाहतूक थांबणार कधी? मार्केट यार्ड परिसरातील नागरिकांचा सवाल
- नेवासा : ही चोरी नाही, तर बनवाबनवी ! जबरी चोरीचा बनाव करणारा चालक मुद्देमालासह नेवासा पोलिसांच्या ताब्यात
The post नाशिक : दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळाले यूडीआयडी प्रमाणपत्र appeared first on पुढारी.