नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
येथील बिझनेस बँकेच्या निवडणुकीची सोमवारी, दि.31 सकाळी मतमोजणी होऊन या मतमोजणीत सहकार पॅनलचे सर्व 14 उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले. या निवडणुकीत सहकार पॅनलचे पाच उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आलेले पहावयास मिळाले.
रविवारी जेलरोड येथील कोठारी कन्या शाळेत मतदान पार पडले. या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून 14 जागेसाठी 15 उमेदवार रिंगणात होते. रविवारी, दि.30 सुमारे सत्तावीस टक्के मतदान झाले. त्यानंतर सोमवारी, दि.31 सकाळी येथील कुलथे मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी फय्याज मुलानी यांच्या उपस्थितीत मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीपासूनच सहकार पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर होते.
निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार असे….
अशोक तापडिया ( 1400 ) विजय संकलेचा ( 1386 ) श्रीनिवास लोया ( 1396 ) वसंतराव नगरकर (1371 ) विजय चोरडिया( 1412 ) गोपी आल ठक्कर ( 1354 ) नेमीचंद कोचर (1391 ) बसंत गुरुनानी ( 1341 ) सचिन घोडके ( 1361 ) सुरेश टरले (1329 ) डॉक्टर पुनमचंद ठोळे ( 1384 ) उमेश नगरकर ( 1380 ) गोरखनाथ बलकवडे ( 1297) मोहन लाहोटी (1390 ) तर अपक्ष उमेदवार जीवन घिया यांना फक्त ( 441 ) मते मिळाली. त्यामध्ये इतर मागासवर्ग गटातून पुरुषोत्तम फुलसुंदर महिला गटातून आशा जाजू राजश्री कपोते भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून अंजली राठोड व अनुसूचित जाती जमाती या गटातून दयानंद सदाफुले हे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणुकीचे निकाल घोषित होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
हेही वाचा:
- खोक्यांच्या चर्चेचे सत्य जनतेसमोर येऊ नये म्हणून शिंदे-फडणवीसांनी राणा-कडू यांच्यात केला समेट : महेश तपासे
- नाशिक : पावसामुळे खोळंबलेली भात कापणी उरकण्यात शेतकऱ्यांची हातघाई !
- पिंपरी : महापालिका शाळा होणार कॉन्व्हेंटच्या तोडीच्या
The post नाशिक : बिजनेस बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी appeared first on पुढारी.