Bohada Festival : मोहाडीत बोहाडा उत्सवास प्रारंभ

Bohada www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
देव-देवतांना साकडे घालून सर्वत्र पाऊस चांगला पडावा व सुखसमृद्धी लाभावी, यासाठी शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या पाचदिवसीय बोहाडा उत्सवाला मोहाडी (ता. दिंडोरी) येथे सुरुवात झाली असून, त्याची सांगता मंगळवारी (दि. 20) सकाळी नृसिंह अवताराने होईल. या निमित्ताने मोहाडीचे ग्रामदैवत मोहाडमल्ल मंदिरासमोर तेल जाळणे व देव-देवतांची सोंगे नाचविणे असा मुख्य कार्यक्रम असतो. यानिमित्ताने गावातील सर्व जाती-धर्मांचे लोक एकत्र येतात व आपल्याला वंशपरंपरेने वाटून दिलेली मुखवटे-सोंगे नाचवतात. बोहाड्याची सुरुवात गणपती आगमनाने होऊन शेवट नृसिंह अवताराने होतो. यानिमित्ताने सामाजिक समतेची व एकात्मतेची अनोखी भावना ग्रामस्थ पाळतात. ज्यांच्याकडे सोंगे नाहीत, पण रामलीलेत उत्साहाने भाग घ्यायचा आहे, अशा हौशी तरुणांसाठी अंधश्रद्धा उद्बोधक ध्वजपर्वणी, भूताळ्या, भगत, नाच्या हे सार्वजनिक ठेवलेले असतात. या काळात गावातील वातावरण भक्तिपूर्ण राहात असून, यानिमित्ताने नोकरी धंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेले लोक बोहाड्यात सक्रिय सहभाग घेतात.

हेही वाचा:

The post Bohada Festival : मोहाडीत बोहाडा उत्सवास प्रारंभ appeared first on पुढारी.