Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला ६१ हजारांचा भाव

सोने - चांदी दर

जळगाव : पुढारी वृत्तसंस्था

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोन्याच्या दराने (Gold Rate) रोज नवनवे विक्रम केले आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला ५६ हजारांच्या आत असलेला सोन्याचा भाव आता ६१ हजारांवर गेला आहे. ऐन लग्नसराई आणि अक्षय्य तृतीयेच्या तोंडावर सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांची चिंता वाढली आहे.

सोन्याच्या दराने (Gold Rate) आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. जळगाव सुवर्ण नगरीत गुरुवारी सकाळच्या सत्रात स्थिर असलेल्या सोन्याच्या भावात शुक्रवारी वाढ दिसून आली. सकाळी २४ कॅरेट सोन्याचा भाव ६१,५०० रुपये (विना जीएसटी) इतका होता. गुरुवारी (१३ एप्रिल) सकाळी ६१,१०० रुपये इतका होता. म्हणजेच त्यात ४०० रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर ५६ हजारांच्या (विना जीएसटी) आत होता. मात्र, गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. एकंदरीत जवळपास दीड महिन्यात सोन्याच्या भावात तब्बल ५ हजार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत सोने ६५ हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.

चांदीचा दर

जळगावात शुक्रवारी (दि.१४) सकाळच्या सत्रात चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीच्या किमतीने नवीन उच्चांक गाठला आहे. सकाळी एक किलो चांदीचा भाव ७७,५०० रुपये (विना जीएसटी) इतका आहे. यापूर्वी गुरुवारी (दि.१३) सकाळी चांदीचा दर ७६,५०० रुपये इतका होता. म्हणजेच त्यात एका दिवसात तब्बल १००० रुपयांची वाढ झाली आहे.

हेही वाचा : 

The post Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला ६१ हजारांचा भाव appeared first on पुढारी.