Jalgaon : मंत्रिमंडळ विस्तारानंतर गिरीश महाजन यांचे जळगावात जंगी स्वागत

जळगाव : गिरीश महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
गेल्या अडीच वर्षांत राज्यात विकास खुंटला होता. विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर आहे. आता डबल इंजिनचे सरकार आहे. राज्यात रखडलेला विकास मार्गी लागेल. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोन्ही दमदार नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला राज्याला पुढे न्यायचे आहे, असे प्रतिपादन ना. गिरीश महाजन यांनी केले.

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. यात जळगाव जिल्ह्यातून भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार गिरीश महाजन यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. शुक्रवारी (दि.12) सकाळी 7 वाजेच्या सुमारास महानगरी एक्सप्रेसने ना. गिरीश महाजन यांचे जळगाव रेल्वेस्थानकावर आगमन झाले. याप्रसंगी रेल्वे फलाटावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ना. महाजन बोलत होते. ना. महाजन यांनी सांगितले की, पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबाबत ना. महाजन यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी पंकजा मुंडे नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ओबीसींवर अन्याय नाही…
मंत्रिमंडळ विस्तारात कुणावरही अन्याय झालेला नाही. गुलाबराव पाटील आणि मी स्वतः ओबीसी आहोत. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर अन्याय केला, हा एकनाथ खडसे यांचा आरोप चुकीचा आहे. ‘तुम्ही म्हणजे सगळे ओबीसी असे समजण्याचे कारण नाही. आपण थोडे शांत रहा. तू तू मैं मैं करू नका’, असा टोलाही महाजन यांनी खडसे यांना लगावला. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे सरकारने ओबीसींवर अन्याय केल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. त्यावर महाजन यांनी पलटवार केला.

हेही वाचा :

The post Jalgaon : मंत्रिमंडळ विस्तारानंतर गिरीश महाजन यांचे जळगावात जंगी स्वागत appeared first on पुढारी.