Jalgaon : रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान

वादळी वारा,www.pudhari.news

जळगाव : रावेर तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे मोठ नुकसान झाले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक कुटुंबाच्या घरांची पडझड झाल्याने अनेक गरीब कुटुंब रस्त्यावर आले. केळी पिकाचे देखील नुकसान झाले असून अनेक ठिकाणी विद्युततार खांबसहीत तुटून पडले आहे. या नुकसानीचे प्रशासनातर्फे पंचनामे केली जात आहे. तालुक्यात ५८ कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

रावेर शहर व परिसरातील रमजीपूर, बक्षीपूर, केऱ्हाळा खुर्द, सिंदखेड, खानापूर, पिंप्री, अहीरवाडी, जुनोना, कर्जोद, गावांमधील घरांचे व २७ गावमधील केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे रावेर शहरात सुमारे १२० घरांचे पत्रे उडून, घरांवर झाडे, विजखांब पडून नुकसान झाले. तर तालुक्यातील २७ गावांमधील केळी बागांचे ५६ कोटी ६८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कृषी आणि महसूल विभागाच्या वतीने प्राथमिक अंदाज वर्तविला असून दहा गावांमधील घरांचे नुकसान झाल्याचा अहवाल महसूल प्रशासनाने व कृषी विभागाने शासनाकडे सादर केला आहे.

नुकसानग्रस्त केळी बागा आणि घरांच्या पंचनाम्यांचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामध्ये २७ गावांमधील १ हजार ६५२ शेतकऱ्यांचे १ हजार २५२ हेक्टर क्षेत्रावरील केळी बागा जमीन दोस्त झाल्या असून सुमारे ५६ कोटी ६८ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. वादळामुळे विजेच्या खांबा वाकून तारे तुटलेली असून वीज वितरण कंपनीने युद्ध पातळीवर काम सुरू केले आहेत. यात वीज वितरण कंपनीचे अंदाजीत सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे अभियंता अनिल पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post Jalgaon : रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान appeared first on पुढारी.