Mango Export : लासलगावने गाठला हजार टन आंबा निर्यातीचा टप्पा

आंबा निर्यात,www.pudhari.news

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व चवीला उत्कृष्ट असल्याने भारतीय आंब्यांना जगभरात पसंती असते. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणाच्या हापूस आंब्याची परदेशवारी यंदाही लासलगावमार्गे झाली असून, एकट्या अमेरिकेत १ हजार टन आंब्याची निर्यात लासलगाव येथील कृषकमधून झाली आहे. गेल्या 15 वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याची मोठ्या झपाट्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया या दिशेने कूच करू लागला आहे. 

15 वर्षांच्या इतिहासात प्रथमच १ हजार टन निर्यातीचे लक्ष्य लासलगाव कृषकने गाठले आहे. लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस या जातींच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते. (Mango Export)

लासलगाव येथे ३१ ऑक्टोबर २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, येथे आता मसाले व आंब्यावरच येथे विकिरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेत जाणाऱ्या आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे.

विकिरण प्रक्रिया म्हणजे?

लासलगावच्या केंद्रात गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ग्रे मात्रा विकिरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढविली जाते. त्यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच, शिवाय कोयीतील कीड नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निर्मितीची प्रक्रिया थांबते. कीड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.

लासलगाव येथे दि. ३१ ऑक्टोबर २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, आता मसाले व आंब्यावरच येथे विकिरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेत जाणाऱ्या आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे.

२००७ पासून लासलगावमार्गे भारतीय आंब्याची झालेली निर्यात 

सन निर्यात (टन)

२००७ १५७

२००८ २७५

२००९ १२१

२०१० ९६

२०११ ८५

२०१२ २१०

२०१३ २८१

२०१४ २७५

२०१५ ३२८

२०१६ ५६०

२०१७ ६००

२०१८ ५८०

२०१९ ६८५

२०२२ – ३५०

२०२३ -१०२३

15 वर्षांच्या इतिहासात प्रथमच १ हजार टन निर्यातीचे लक्ष्य लासलगाव कृषकने गाठले आहे. एकट्या अमेरिकेत १ हजार टन आंबे प्रक्रिया करून यशस्वीरीत्या निर्यात केले आहे.

-संजय आहेर,विकिरण प्रकिया अधिकारी, भाभा अणुसंशोधन केंद्र, लासलगाव…

हेही वाचा :

The post Mango Export : लासलगावने गाठला हजार टन आंबा निर्यातीचा टप्पा appeared first on पुढारी.