Market Committee Election : व्यापारी गटाची निवडणूक बिनविरोध

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत आज (दि.20) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी व्यापारी गटाच्या निवडणूकीत ११ उमेदवारांपैकी ९ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुक बिनविरोध झाली. यात पिंगळे गटाचे जगदीश अपसुंदे व संदीप पाटील हे बिनविरोध निवडून आले आहे. यापूर्वीच चंद्रकांत निकम हे हमाल मापरी गटातून बिनविरोध झाले होते. पिंगळे गटाने या निवडणुकीत सरशी घेत आतापर्यंत १८ पैकी ३ जागा बिनविरोध करत विजयाचा श्री गणेशा केला आहे.

जगदीश अपसुंदे व संदीप पाटील यांचे माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार हिरामण खोसकर, संपत सकाळे, विश्वास नागरे, शाम बोडके, माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, कमलेश बोडके, शरद सानप आदींनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा : 

The post Market Committee Election : व्यापारी गटाची निवडणूक बिनविरोध appeared first on पुढारी.