Nashik : पन्नास खोके, ईडी पण ओके; नाशिकमध्ये युवक राष्ट्रवादीचे आंदोलन

राष्ट्रवादी आंदोलन

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशी विरोधात युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली  कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा हमसे डरती है, ईडी को आगे करती है…, पन्नास खोके, इडी पण ओके अशा घोषणांनी परिसर दणाणला होता.

जयंत पाटील यांचा आयएल आणि एफएलएस सोबत कोणताही संबंध नसताना त्यांच्या सोबत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत ईडी ने त्यांना चौकशीकरीता समन्स बजावला. सत्तेचा गैरवापर करत भाजपा सक्तवसुली संचालयाने ED च्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील नेत्यांना लक्ष केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी केला. दुटप्पी आणि कुटील धोरणांच्या विरोधात आपण उचित कारवाई करून लोकशाही वाचवावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादीकूडन देण्यात आले.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासह सेनेचे नेते संजय राऊत यांच्यासारख्या विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी भाजपाकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर वापर केला जात आहे. केंद्रीय यंत्रणा सूडाच्या भावनेतून सगळयांची चौकशी करत आहे. जयंत पाटील हे आमचे खंबीर नेते आहेत. ते ईडीच्या चौकशीला सामोरे जात असताना सुद्धा त्यांच्यावर राजकीय दबावाचे षडयंत्र आणले जात आहे. ते या दबावापुढे झुकणार नाहीत. त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. ते निर्दोष बाहेर पडतील.

– अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

यावेळी नाशिक लोकसभा अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, बाळा निगळ, दिनेश धात्रक, मुकेश शेळके, गणेश गायधनी, डॉ.संदीप चव्हाण, शाम हिरे, निलेश भंदुरे, रामदास मेदगे, गोरख ढोकणे, राहुल कमानकर, किरण पानकर, किरण भुसारे, नवराज रामराजे, विक्रांत डहाळे, महेश शेळके, संतोष जगताप, अक्षय भोसले, अमोल नाईक, तौसीफ मणियार, हर्षल चव्हाण, रवी बसते, भावेश निर्वाण, रियान शेख, शुभम भास्कर, रामेश्वर साबळे, आकाश पिंगळे, अक्षय पाटील, शांताराम झाले, तुषार खांडवाले, संदीप गोतरणे, संदीप ढेरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

The post Nashik : पन्नास खोके, ईडी पण ओके; नाशिकमध्ये युवक राष्ट्रवादीचे आंदोलन appeared first on पुढारी.