Nashik : भरधाव कारच्या धडकेत मोपेडस्वार जागीच ठार

अपघात,www.pudhari.news

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

भरधाव कारच्या धडकेत मोपेडस्वाराच जागीच मृत्यू झाल्याची घटना वणी नाशिक रस्त्यावर शंखेश्वर मंदिरा समोर घडली. या अपघातात एक महिला जखमी असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नाशिक- कळवण रोडवर वणी येथील शंखेश्वर मंदिर जवळ आज (दि. 22) दुपारच्या सुमारास होंडा सिटी व मोपेड यांचा अपघात झाला.  या अपघातात मोपेड वरील राहुल अमरनाथ भाटी  (२६) वणी यांचा मृत्यू झाला. तर मनीषा विक्रम पवार (२०), वणी या जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अधिक माहितीनुसार,  एम एच ४३ एन ७२९५ या होंडा सिटी कारने एम एच १५ जी वाय ४५२२ या मोपेडला धडक दिली. कार ही नाशिक कडून वणीच्या दिशेने भरधाव वेगात येत होती.  चालकाचे नियंत्रण सुटले व कारने दोन तीन पलट्या घेतल्या. यावेळी मोपेड वरील राहुल भाटी व मनिषा पवार यांना कारणे उडविल्याने यात राहुल भाटी यांचा मृत्यू झाला. तर मनिषा यांना गंभीर दुखापत झाली असून नाशिक येथे त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले.

दरम्यान गाडीचा चालक व त्याच्याबरोबर असलेले अपघात स्थळावरून पळुन गेले. राहुल भाटी हे दगडाच्या मूर्ती बनवित.  अनेक वर्षांपासून हा व्यवसाय ते करीत होते. वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहेत.

हेही वाचा : 

The post Nashik : भरधाव कारच्या धडकेत मोपेडस्वार जागीच ठार appeared first on पुढारी.