Nashik : शिंदे गटाच्या कार्यक्रमात सत्यजित तांबे, म्हणाले गरजेवेळी शिवसेना…

सत्यजित तांबे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जेव्हा गरज पडते, तेव्हा तेव्हा शिवसेना वैद्यकीय सहायता कक्षाची मदत घेतो. त्यावेळी आपण वेगळ्या पक्षात आहोत याचा विचार केला जात नाही. तसेच शिवसेना वैद्यकीय कक्षदेखील कधी असा विचार करत नाही. कोणत्याही व्यक्तीचा कॉल आला तरी हा कक्ष 24 तास 365 दिवस वैद्यकीय सहायतेसाठी तत्पर असते, असे प्रतिपादन विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.

शिवजयंतीनिमित्त शिंदे गटाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मुंबईनाका बसस्थानक येथे करण्यात आले होते. त्यावेळी आ. तांबे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यावेळी उपस्थित होते. आ. तांबे यांच्या येथील हजेरीने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. त्यावेळी तांबे यांनी शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाचे काैतुक केले.

आज (दि. १९) आरोग्य शिबिराच्या दादा भुसेंसंह शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी भेट दिली होती. आमदार सत्यजित तांबे यावेळी कोरोना काळातील आठवण सांगितली. कोरोना काळात एका जवळच्या माणसाचा ठाण्यात मृत्यू झाला होता, त्यावेळी अंत्यविधी करण्यासाठी कुणीही नव्हतं. तेव्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला ही बाब सांगितली. त्यांनी तत्काळ टीम पाठवली. त्यावेळेस त्या व्यक्तीचा अंत्यविधी करण्यात आला. नेहमीच वैद्यकीय कक्ष आमच्यासाठी उभा असतो. त्याचमुळे याठिकाणी आलो असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा : 

The post Nashik : शिंदे गटाच्या कार्यक्रमात सत्यजित तांबे, म्हणाले गरजेवेळी शिवसेना... appeared first on पुढारी.