Nashik : आमदार सरोज अहिरे दादांसोबत की साहेबांसोबत? भूमिकेकडे लक्ष

आमदार सरोज अहिरे,www.pudhari,news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी अजितदादा पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे माजी आमदार योगेश घोलप यांचे लक्ष लागले आहे.

देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सरोज अहिरे मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत. त्यांनी माजी आमदार योगेश घोलप यांचा पराभव केला होता. आमदार अहिरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीत घेतलेल्या भूमिकेमुळे घोलप गटात आनंदोत्सव साजरा केला जातो आहे. लवकरच घोलप गट मतदारसंघात अधिक सक्रिय होणार असून आमदार अहिरे यांच्या राजकीय भूमिकेविषयी मतदारांमध्ये जागृती निर्माण केली जाणार असल्याचे समजते. आमदार अहिरे या अजितदादा पवार सोबत आहे की शरद पवारांसोबत याविषयी मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरू होत्या.

आमदार सरोज अहिरे यांनी अनेक वेळा मी शरद पवार यांची मानसपुत्री आहे, असे मतदारसंघातील नागरिकांना सांगितले. त्यामुळे आमदार सरोज अहिरे या शरद पवार यांना पाठिंबा देणार की, अजितदादा यांच्यासोबत जाणार याविषयी नागरिकांना उत्सुकता आहे. 

हेही वाचा : 

The post Nashik : आमदार सरोज अहिरे दादांसोबत की साहेबांसोबत? भूमिकेकडे लक्ष appeared first on पुढारी.