Nashik : एक लाखाची गावठी दारू जप्त

गावठी दारु जप्त,www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

वडनेरभैरव पोलिस ठाणे हद्दीतील वडारवाडी हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकत सुमारे एक लाख ३ हजार ५०० रुपयांची गावठी दारू जप्त करत नष्ट केली. या कारवाईत चौघा जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक गौतम तायडे यांनी दिली.

वडारवाडी (वडनेर भैरव) येथे राहणारे जयश्री गुंजाळ, गायत्री जाधव, छाया जाधव, कैलास जाधव हे त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे हातभट्टीवर गावठी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यांनी तेथे छापा टाकत १८०० लिटर गावठी दारू बनवण्याचे रसायन (९० हजार रुपये) तसेच १३५ लिटर गावठी दारू (१३,५०० रुपये) अशी एक लाख रुपयांची गावठी दारू जप्त केली. हे रसायन जागेवर नष्ट करण्यात आले. यात ३ महिला आरोपींना ताब्यात घेण्यात येऊन त्यांच्यावर चार गुन्हे दाखल करण्यात आले.

हेही वाचा :

The post Nashik : एक लाखाची गावठी दारू जप्त appeared first on पुढारी.