Nashik : चांदवडला गांजा तस्कर टोळी जेरबंद

गांजा तस्करी रोखली,www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

मध्यरात्रीच्या सुमारास गांजाची तस्करी करणाऱ्या मालेगावच्या दोघा भामट्यांच्या टोळीला अटक करण्यात चांदवड पोलिसांना यश आले. या दोघांकडून सहा किलो गांजा, दोन मोबाइल, रोख रक्कम व चारचाकी गाडी असा एकूण ४ लाख ६६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती चांदवड पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस उपअधीक्षक सविता गर्जे यांनी दिली.

चांदवड पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार सांगळे, पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप आजगे, अनिल गांगुर्डे हे शुक्रवारी (दि.१८) मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी महामार्गावर एक कार (एम. एच. ०४, ई. एक्स. ८२८१) थांबवत त्यातील मोहम्मद आसिफ अब्दुल रहिम (४३, इस्लामपुरा, मोसमनदी, मालेगाव) व हुजाफा मलिक जावेद अहमद (२३, रविवार वार्ड, मालेगाव) या दोघांची चौकशी केली असता ते घाबरले. यामुळे कारची झडती घेतली असता गांजा असल्याचे पोलिसांना समजले. यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलिस उपनिरीक्षक कैलास चौधरी, हवालदार बाळू सांगळे, विजय जाधव, अमोल जाधव, पोलिस नाईक चेतन बागल, दिनेश सुळ, कॉन्स्टेबल प्रदीप आजगे, विक्रम बसते, चंद्रकांत पवार, प्रदीप सोळंके, विनोद लोखंडे आदी उपस्थित होते. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भानुदास नऱ्हे करीत आहे.

हेही वाचा :

 

The post Nashik : चांदवडला गांजा तस्कर टोळी जेरबंद appeared first on पुढारी.