Nashik : जिल्हा परिषदेच्या आवारात वाहने सडली

जिल्हा परिषद नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

जिल्हा परिषदेत मागील बाजूस असलेली इमारत कचऱ्याच्या विळख्यात सापडलेली आहे. येथे निर्लेखित करण्यात आलेली वाहने, पालापाचोळा, सांडपाणी उघड्यावर सोडल्याने दुर्गंधी पसरली आहे.

जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी, विभागप्रमुख वाहने वापरत असतात. ही वाहने शासनाने ठरवून दिलेला अवधी पूर्ण झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रमाणपत्र मिळवून निर्लेखित करण्यात येतात. मात्र, सध्या जिल्हा परिषदेत नवी प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूस ही वाहने उभी करण्यात आली आहेत. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष नसल्याने पाणी, कचरा साचून आरोग्याचा प्रश्न उभा राहत आहे. जिल्हा परिषदेचे कर्मचारी येथील पाण्याने आपली वाहने धूत असल्याचेही यावेळी समोर आले.

दरम्यान, एका बाजूला ग्रामस्तरावर स्वच्छतेचे धडे देणारी जिल्हा परिषद स्वत:च्या परिसरात असलेला कचरा साफ करू शकत नसल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वस्तुतः जिल्हा परिषदेने सध्या रंगरंगोटीचे काम हाती घेतले आहे. मात्र, रंगरंगोटीसोबत स्वच्छतेकडे लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : जिल्हा परिषदेच्या आवारात वाहने सडली appeared first on पुढारी.