Nashik : मनमाडला पाण्यासाठी मनसेचा मोर्चा

मनसेचा पाण्यासाठी मोर्चा ,www.pudhari.news

नाशिक, मनमाड :  पुढारी वृत्तसेवा
धरण पूर्ण भरलेले असूनदेखील दिवाळी सणाच्या काळात शहरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असून, शहरात नियमित आणि सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगर परिषदेवर मोर्चा काढला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली.

यावेळी नगरपालिका प्रशासनाने किमान आठवड्यातून एकदा तरी पाणीपुरवठा करावा अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष सचिन शिरूड यांनी दिला आहे. पाकिजा कॉर्नरपासून शहराध्यक्ष सचिन शिरूड, रोहिणी गागरे, कल्पना दराडे आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अमृत ताजणे यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, यंदा पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण भरले आहे. असे असूनही शहरात 20 ते 22 दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. दिवाळीसारख्या सणाला पुरेशा प्रमाणात पाणी नसल्याने नागरिकांत नाराजी आहे. यावेळी अनिल सांगळे, पवन दराडे, रावसाहेब गरुड, योगेश आहेर, गणेश चव्हाण, दुर्गेश सांगळे, नितीन कचरे, राहुल पांडे, जाकिर पठाण, शंकर आंधळे, आकाश उघडे, सौरव पवार, प्रमोद राणा, प्रवीण अहिरे, साहेबराव गडकर, रितेश देवगीर आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post Nashik : मनमाडला पाण्यासाठी मनसेचा मोर्चा appeared first on पुढारी.