Nashik | महावितरण : दहा लाख ग्राहकांकडून ४७० कोटींचा भरणा, ऑनलाइन बिल भरण्यास पसंती

महावितरण,www,pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महावितरणच्या ऑनलाइन वीजबिल भरण्याला ग्राहकांची पसंती मिळत आहे. राज्यात दरमहा सरासरी १ कोटी १० लाख ग्राहक पाच हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा भरणा घरबसल्या करतात. नाशिक परिमंडळामधील १० लाख ५३ हजार ग्राहकांकडून ४६९.६४ कोटी रुपयांचा भरणा केला जात आहे.

बदलत्या जीवनशैलीसोबत महावितरणने त्यांच्या ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइन वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आजमितीस महावितरणच्या एकूण ग्राहकांपैकी तब्बल ६५ ग्राहक या सुविधेचा लाभ घेत आहेत. त्यानुसार महावितरणच्या उच्चदाब व लघुदाबाच्या एक कोटी १० लाख ग्राहकांनी एकूण वसुलीच्या रकमेपैकी तब्बल पाच हजार ७५० कोटी रकमेचा ऑनलाइनद्वारे भरणा केला आहे. त्यामध्ये महावितरणच्या नाशिक परिमंडळातील १० लाख ५३ हजार ग्राहकांनी ४६९.६४ कोटी रुपयांच्या ऑनलाइन बिलांच्या भरण्याचा समावेश आहे.

ऑनलाइन वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या बिलामध्ये ०.२५ टक्के, तर बिलाचे प्रॉम्ट पेमेन्ट केल्यास एक टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट ग्राहकांना देण्यात येते. अधिकाधिक ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिलांचा भरणा करण्याचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

असा झाला भरणा

नाशिकप्रमाणे महावितरणच्या पुणे परिमंडळातील २२ लाख ८३ हजार ग्राहकांनी सर्वाधिक १२०२ कोटी ७६ लाखांचा वीजबिलांचा भरणा केला. त्यानंतर कल्याण परिमंडळात १९ लाख ७ हजार ग्राहकांनी ७२५.७९ कोटी, तर भांडूप परिमंडलामध्ये १७ लाख ३१ हजार ग्राहकांनी १००५ कोटी ४१ लाखांची बिले ऑनलाइन भरली. बारामतीमध्ये १० लाख ६८ हजार ग्राहकांनी ५१९.३५ कोटींचा भरणा केला.

हेही वाचा : 

The post Nashik | महावितरण : दहा लाख ग्राहकांकडून ४७० कोटींचा भरणा, ऑनलाइन बिल भरण्यास पसंती appeared first on पुढारी.