Nashik : वीज मंडळाचा अधिकारी करतोय प्रवचनातून वीज बिल वसुली

प्रवचनातून बीजबील वसूली,www.pudhari.news

निफाड (जि. नाशिक) प्रतिनिधी

महावितरण कंपनीच्या निफाड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे हे विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी असून वीज बिल वसुलीसाठी त्यांनी किर्तन प्रवचनाद्वारे विज ग्राहकांना बिल भरण्यासाठी प्रवृत्त करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतलेला आहे.

निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथील नानाजी महाराज आश्रमात श्रीहनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्ष पूर्ती निमित्ताने आयोजित सोहळ्यात अध्यात्म आणि राष्ट्र सेवा या विषयावर गावकऱ्यांनी त्यांच्या प्रवचनाचे आयोजन केलेले होते.

नागरे यांनी आपल्या प्रवचनातून स्पष्ट केले की, अध्यात्मिक जीवन जगणे ही काळाची गरज आहे. साधना हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनल्यास आपल्याला कायमस्वरूपी आनंदी राहता येते, अध्यात्म आणि राष्ट्रसेवा या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असून, छोट्या छोट्या गोष्टीतून देखील आपल्याला राष्ट्रसेवा करता येते.  आपण वापरत असलेल्या विजेच्या बिलांचा भरणा वेळेवर करणे ही देखील एक प्रकारची राष्ट्रसेवाच आहे. त्यामुळे नागरिकांनी घरगुती, वाणिज्य, औद्योगिक व शेतीपंप यांची विज बिले नियमितपणे वेळेवर भरून राष्ट्राच्या उन्नती मध्ये आपला वाटा उचलावा असेही आवाहन नागरे यांनी केले.

याप्रसंगी आश्रमाचे प्रमुख गोविंद महाराज, कीर्तनकार हभप मुकुंद महाराज आभाळे, प्रगतशील शेतकरी बाबुराव सानप, साहेबराव सानप, रावसाहेब निचीत, काशिनाथ पडोळ, नवले, क्षीरसागर, पवार आदी शेतकरी व भावीक उपस्थित होते.

हेही वाचा :

The post Nashik : वीज मंडळाचा अधिकारी करतोय प्रवचनातून वीज बिल वसुली appeared first on पुढारी.