Nashik Accident : आईच्या डोळ्यादेखत मुलगा अपघातात ठार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

राणेनगरकडे आईसोबत रस्ता ओलांडताना सहावर्षीय बालकाचा नाशिककडून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीची धडक बसून मृत्यू झाला. आई समोरच मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर वाहनचालक फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सकाळी ६च्या सुमारास कशिश हॉटेलसमोरील उड्डाणपुलाखालील रस्त्यावरून आशिष सुनील धोत्रे (वय ६ रा, महाकाली चौक, सिडको) आईसोबत राणेनगरकडे जात होता. त्याच्या हातातील पिशवी पडल्याने ती उचलण्यासाठी तो माघारी फिरला. त्याचवेळी व्दारकाकडून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एक पांढऱ्या रंगाच्या वाहनाची जोरदार धडक बसली. धडकेनंतर चालक फरार झाला. जखमी आशिषला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याबाबत अनोळखी वाहनचालकाविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास अंबड पोलिस करत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Accident : आईच्या डोळ्यादेखत मुलगा अपघातात ठार appeared first on पुढारी.