Nashik Crime : खंडणी मागणारा पाच वर्षांनी गजाआड

crime

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बांधकाम ठेकेदारास चॉपरचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या संशयितास खंडणीविरोधी पथकाने पाच वर्षांनी गजाआड केले. बाळू शंकर कदम (३२, रा. कॅनाॅल रोड झोपडपट्टी, जेलरोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.

सुनील चापळकर (रा. जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित बाळा ऊर्फ विजय उदैनकर, बाळू कदम, सचिन धोतरे यांनी १६ जून २०१८ रोजी सकाळी पेंढारकर कॉलनी येथे दमदाटी करीत चॉपरचा धाक दाखवून १५ हजार रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित बाळू कदम फरार होता.

दरम्यान, खंडणीविरोधी पथकातील अंमलदार स्वप्निल जुंद्रे व मंगेश जगताप यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने जेलरोड परिसरात रविवारी (दि.२३) सापळा रचला. पथकाने बाळू कदम यास पकडून उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिस तपासात बाळू विराेधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात २०१९ मध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : 

The post Nashik Crime : खंडणी मागणारा पाच वर्षांनी गजाआड appeared first on पुढारी.