Nashik Crime : खिडकीवाटे दरवाजा उघडून तीन मोबाइलसह रोकड लांबवली

चोरी

नाशिक : खिडकीतून हात टाकून दरवाजाची कडी उघडून चोरट्याने चोरी केली. भारत नगर येथे घडलेल्या या चोरीत चोरट्याने २२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. फैजल इस्तेखार शेख (१९) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने बुधवारी (दि.२१) पहाटे खिडकीतून दरवाजा उघडून घरात शिरला. घरातील १८ हजार ५०० रुपयांचे तीन मोबाइल व साडे सात हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2) दानपेटीतील रोकड लंपास

मंदिरात घरफोडी करून दानपेटीतील रोकड चोरून चोरटा पसार झाल्याची घटना आडगांव शिवारातील कांतीमणी विहार मंदिरात घडली. याप्रकरणी सुनील नामदेव शिरसाठ (४७, रा. बीडीकामगार नगर) यांनी आडगांव पोलिस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली आहे. चोरट्याने ७ ते ८ डिसेंबर दरम्यान, मंदिरात घरफोडी करून तेथील दानपेटी चोरली. मंदिराबाहेर दानपेटी फोडून चोरट्याने त्यातील पाच हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी आडगांव पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Crime : खिडकीवाटे दरवाजा उघडून तीन मोबाइलसह रोकड लांबवली appeared first on पुढारी.