Nashik Crime : तडीपार असतानाही शहरात वावरणारे दोघे ताब्यात

अटक,www.pudhari.news

नाशिक : शहर परिसरासह जिल्ह्यातून तडीपार केल्यानंतर शहरात विनापरवानगी वावरणाऱ्या दोघा संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दीपक भिकन जगताप (२५, रा. कुमावतनगर) याला एक वर्षासाठी हद्दपार केले असतानाही तो पंचवटीतल ‌खंडेराव महाराज पटागंण येथी चायनिज गाड्याजवळ पुर्वपरवानगीशिवाय आढळून आला. तर प्रविण उर्फ बादल पवन वाघ (२३) यालाही एक वर्षासाठी हद्दपा केले असतानाही तो इंद्रकुड परिसरात मिळून आला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीसह रिक्षाची चोरी

नाशिक : शहरासह उपनगरांमध्ये भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून, वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकीसह रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिषचंद्र रघुनाथ मंडलिक (५८, रा. चव्हाटा, जुने नाशिक) यांची स्वमालकीची दुचाकी (एमएच १५, बीसी ४७१९) गंगाघाट परिसरातून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. तर राजेंद्र बाबुराव सुर्यवंशी (५०, रा. चांडक सर्कल) यांची स्वमालकीची रिक्षा (एमएच १५, झेड ९३९८) राहत्या घराजवळ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

कारची काच फोडून लॅपटॉप लांबविला

नाशिक : कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी २५ हजारांचा लॅपटॉप लांबविल्याची घटना लवाटेनगरमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश अंनत आंबेवाडीकर (४२, रा. शिव कॉलनी, इंदिरानगर) यांनी स्वमालकीची इरटिका कार सीसीएम मॉल येथील वाहनतळावर उभी केली होती. अज्ञात चोरट्यांनी कारच्या मागील दरवाजाची काच फोडून नुकसान करत लॅपटॉप घेऊन पोबारा केला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहन पार्क करण्याच्या वादातून युवकाला मारहाण

नाशिक : वाहन पार्क करण्याच्या वादातून तिघांनी युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना बजरंगवाडीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल जमील शेख (२२, रा. सानिया हाऊस, खोडेनगर) याचा संशयित अजहर एजाज पठाण, मजहर एजाज पठाण, साहिल एजाज पठाण यांनी वाहन पार्क करण्याच्या कारणावरून वाद झाला. संशयितांनी दमदाटी करून मारहाण करत शेखला दुखापत केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

The post Nashik Crime : तडीपार असतानाही शहरात वावरणारे दोघे ताब्यात appeared first on पुढारी.