Nashik Gram Panchayat Election Results Live : तुमच्या गावचा कारभारी कोण? पाहा इथे…

निवडणूक स्पर्धा www.pudhari.news

नाशिक : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी आज मंगळवारी (दि. २०) तालुकास्तरावर मतमोजणी सुरु आहे.  दुपारी १२ पर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता असून, त्यानंतरच कोणता उमेदवार विजयाचा गुलाल उधळणार हे स्पष्ट होईल.

जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील १८९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. १८) शांततेत मतदान पार पडले. थेट सरपंच व सदस्य पदांसाठी झालेल्या निवडणुकीत सरासरी ८० टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे.  अनेक ठिकाणी तिरंगी व चाैरंगी लढती असल्याने निवडणुकीत रंग भरले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाची रंगीत तालीम म्हणून ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे पाहिले जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, माजी पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आ. सुहास कांदे आदींची प्रतिष्ठा या निवडणुकीमूळे पणाला लागली आहे.

Nashik Gram Panchayat Election Results Live :

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी पहिल्या फेरीचे निकाल हाती लागले आहेत. यात चार ग्रामपंचायतींवर भाजप तर एका ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने खाते उघडले आहे.

चांदवडचा हाती लागलेला निकाल असा-

1. आडगाव – लताबाई घुले – भाजप,

2. शेलू – अमोल जाधव – भाजप

3. पाटे कोलटेक – रंगनाथ सूर्यवंशी – महाविकास आघाडी

4. निंबाळे – रविना विष्णू सोनवणे – भाजप

5. चिचोले – पवन साहेबराव जाधव – भाजप

कळवण तालुका – तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा निकाल हाती लागला आहे. यामध्ये कळवण खुर्द ग्रामपंचायत -भाजप, शिरसमनी ग्रामपंचायत -राष्ट्रवादी, निवाने ग्रामपंचायत- राष्ट्रवादी ने सत्ता काबीज केली आहे.

येवला तालुका –  येवला तालुक्यातील प्रति पंढरपूर असलेल्या कोटमगाव बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सोनाली कोटमे या सध्या विद्यमान सरपंच आणि भुजबळांच्या कट्टर समर्थक यांचा पराभव राजेंद्र काकळीच या नवख्या उमेदवाराने केला आहे. विशेष म्हणजे या गावाला भुजबळांनी कोट्यावधीॆचा निधी देऊन या ठिकाणी भव्य असे विठ्ठलाच्या मंदिराचे विकास काम केले आहे.

 

The post Nashik Gram Panchayat Election Results Live : तुमच्या गावचा कारभारी कोण? पाहा इथे... appeared first on पुढारी.