Nashik I आरोग्य विद्यापीठाची नियोजित वेळापत्रकानुसारच होणार परीक्षा

आरोग्य विज्ञान विद्यापीठ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अयाेध्या सोहळ्यानिमित्ताने राज्य शासनाने सोमवारी (दि. २२) सार्वजनिक सुट्टी घोषित केली आहे. परंतु, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विविध विद्याशाखांची फेज-3 मधील लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा जाहीर केलेल्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

राज्य शासनाने अयोध्या येथील श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा असल्याने २२ तारखेला सुटी जाहीर केली आहे. मात्र विद्यापीठाने हिवाळी सत्राकरिता फेज-3 साठी जाहीर केलेल्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा होतील, असे विद्यापीठ परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले आहे. परीक्षेकरिता प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांनी याबाबत विद्यापीठाच्या सूचनेची नोंद घ्यावी. विद्यापीठाचे सर्व संलग्नित महाविद्यालयातील अधिष्ठाता, प्राचार्य यांनी नियोजित या वेळापत्रकाप्रमाणे होणाऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे डॉ. कडू यांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

The post Nashik I आरोग्य विद्यापीठाची नियोजित वेळापत्रकानुसारच होणार परीक्षा appeared first on पुढारी.