
लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
लासलगाव येथे लग्नात आलेल्या महिला वऱ्हाडी शिक्षिकेच्या साडेअकरा तोळे सोन्यावर चोरट्याने डल्ला मारल्याची घटना गारवा लॉन्स येथे घडली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, २२ मे रोजी नाशिकच्या वृषाली सतीश हांडगे या लासलगावी नातलगाच्या विवाहानिमित्त आल्या होत्या. त्यांचा लहान मुलगा शिवराज यास शौचास लागल्याने त्या त्याला घेऊन लॉन्स पार्किंगच्या जागेत आल्या. तेथे आलेल्या एका व्यक्तीने हे जगताप यांचे लग्न आहे काय? असे विचारून लक्ष विचलित करून त्यांच्या अंगावरील साडेअकरा तोळ्याचे दागिने हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात तीन लाख ३६ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक देवीदास लाड पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- Road accident: गेल्या वर्षभरात राज्यात १५ हजारांहून अधिक जणांचा रस्ते अपघातात मृत्यू
- नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या आदेशासह जिल्हा उपनिबंधकांच्या नोटिशीला स्थगिती
- Road accident: गेल्या वर्षभरात राज्यात १५ हजारांहून अधिक जणांचा रस्ते अपघातात मृत्यू
The post Nashik Lasalgaon : वऱ्हाडी आलेल्या शिक्षिकेच्या साडेअकरा तोळे सोन्यावर डल्ला appeared first on पुढारी.